Ads



Wednesday, November 1, 2017

माझी शाळा सुंदर शाळा

🔹माझी शाळा सुंदर शाळा 🔹
या उपक्रमाअंतर्गत मुलांना घराप्रमाणे शाळेची स्वच्छता कशी ठेवावी, हे समजले. मुले शाळेत आल्यानंतर लगेचच स्वत: क्रीडांगणावरील केरकचरा हाताने उचलत, त्यासोबतच वर्गाची साफसफाई दररोज मुले स्वमनाने करू लागली. पावसाळ्याच्या दिवसात मुलांच्या हस्ते वृक्ष लागवड करून मुलांनी आपापल्या झाडाशी निगा राखणे, पाणी टाकणे अशा जबाबदार्‍या सोपवून दिल्या व त्या मुलांनी आवडीने पार पाडल्या.
🔹स्टुडंट ऑफ दी मंथ🔹
ग्रामीण भागातील मुलांनी नियमितपणे शाळेत यावे, यासाठी साबळे सरांनी या उपक्रमाची सुरुवात केली. या अंतर्गत जो मुलगा महिनाभरात जास्तीत जास्त दिवस उपस्थित राहील, दिलेला स्वाध्याय, वर्गकार्य उत्कृष्टपणे पूर्ण करील, तो ‘स्टुडंट ऑफ दी मंथ’ ठरवून त्याला प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाते.
🔹बोलका वर्ग🔹
एक चित्र हजार शब्दांचे काम करते, असे मानसशास्त्र आपणास सांगते. याच सिद्धांताचा उपयोग करून मॅडमनी बोलका वर्ग तयार केला. यात मुले वर्गात गेल्यानंतर स्वत:च्या विश्वात गुंग होऊन जातात. वर्गातील चित्रे, विविध चित्ररूपी तक्ते, अंकपट्ट्या, अक्षरपट्ट्या, प्रतिकृती, तोरण, तरंग चित्र, शब्दकोडे, अंकशिडी यांसह असंख्य चित्ररूपी संकल्पना मनातून कागदावर उतरवून मॅडमनी मुलांच्या भावविश्वाला आकार दिला.
🔹स्पर्धेतून ज्ञानवृद्धी🔹
माहिती तंत्रज्ञानाच्या व स्पर्धेच्या या युगात खेड्यातील मुलांना संधी प्राप्त करून देण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात केली. या अंतर्गत विविध विषयांवर मुलांना निबंध लेखन, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वाद-विवाद, एकांकिका, गायन, नृत्य अशा स्पर्धा घेऊन मुलांच्या उपजत कलागुणांना वाव देण्यासोबतच शिक्षणप्रक्रिया आनंददायी करण्याचा प्रयत्न केला. याचा फायदा असा झाला की, जी मुले अभ्यासात थोडी मागे होती ती या इतर स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदवू लागली व आपल्या मनातील संकल्पना कागदावर उतरवू लागली. तसेच शाळेत नियमित उपस्थितीही दररोज वाढतच चालली होती.
🔹एक मिनिट🔹
याद्वारे मुलांची स्मरणशक्ती वाढवणारे खेळ घेणे, वस्तू पाहून त्यांची यादी तयार करणे, प्राणी, पक्षी, फुले, औषधी वनस्पती, डोंगर, नद्या, चित्र व शब्दांच्या जोड्या, म्हणी पूर्ण करणे, शब्दातला समानार्थी शब्द जोडणे, वाक्य पूर्ण करणे हे खेळ मुलांकडून घेतले. एका मिनिटात जो जास्त माहिती सांगेल, त्या मुलांना बक्षीस दिले. त्यामुळे बाकीची मुलेही मन लावून अभ्यास करू लागली.
🔹जिव्हाळा🔹
शिक्षक वर्गात ज्ञानार्जन करताना सर्व मुलांनी आपल्या शिकवण्याकडे लक्ष द्यावे, असा अट्टहास धरतात. मात्र, समोर बसलेल्या मुलांची मानसिकता कशी आहे, याकडे बहुतांश जण लक्ष देत नाहीत. मॅडमनी या उपक्रमाद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिगत अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे मुले मॅडमला आपल्या घरातील अडचणी सांगू लागले व त्या समुपदेशनाद्वारे मॅडमनी सोडवल्यामुळे शिक्षक, विद्यार्थी आंतरक्रिया वाढीस लागली व मुलांसोबतच शिक्षकांचे संबंध जिव्हाळ्याचे बनले व विद्यार्थी आत्मविश्वासाने निर्भय बनले.
🔹स्पर्धा परीक्षेसाठी उपक्रम🔹
(१) प्रश्नमंजूषा, (२) शिष्यवृत्ती सराव व मार्गदर्शन व (३) शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेणे.
🔹इतर उपक्रम🔹
(१) गरीब व होतकरू मुलींसाठी स्वत: शैक्षणिक साहित्य स्वखर्चातून वाटप करणे. (२) निसर्ग सहलीचे आयोजन करून त्याद्वारे मुलांना पर्यावरणाची आवड, निगा कशी राखावी याविषयी मार्गदर्शन करणे. (३) कार्यानुभवाअंतर्गत टाकाऊ वस्तूंपासून विविध आकर्षक वस्तूंची
निर्मिती करणे. (४) गटकार्यातून अप्रगत मुलांना प्रगत करण्यासाठी समवयस्क मुलांचा उपयोग करून घेणे.
0 comments

शाळेबद्दल थोडक्यात

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोखा ता.बाळापुर जिल्हा अकोला शाळेबद्दल थोडक्यात - मोखा हे गाव बाळापुर तालुक्यात असून निम्बा फाटा वरून पश्चिमेस  १० किलोमीटर अंतरावर वसले आहे. या गावाचा परिसर डोंगराळ व जंगलाने व्यापलेला आहे. गावाच्या उत्तर दिशेला ३ किलोमीटर अंतरावरून पुर्णा नदी वहाते. गावाच्या दक्षिणेला १.५ किलोमीटर अंतरावर वज़ेगाव श्री रामचंद्र महाराज संस्थान मंदिर आहे. गावाच्या जवळील परिसरात रोही, हरणे, माकडे, नीलगायी, अस्वल, ई. प्राणी आढळतात. गावात विविध जाती-धर्माचे लोक गुण्या गोविंदाने रहातात. अशा निसर्गरम्य परिसरात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मोखा वसलेली आहे.
0 comments

शाळेत राबवले जाणारे उपक्रम


शाळेत राबवले जाणारे उपक्रम -
१. विज्ञान प्रदर्शन
२. स्नेह संमेलन
३. ग्रामस्वच्छता अभियान
४. बंधारा योजना
५. आदर्श परिपाठ
६. रक्षाबंधन कार्यक्रम
७. सुंदर बगीचा
८. थोर महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी
९. क्रीडा स्पर्धा
१०. वृक्षारोपण व वृक्षसंगोपन
११. योगासने व व्यायाम
0 comments

क्षेत्रभेट— बॅन्क भेट



क्षेत्रभेट— बॅन्क भेट 
ज्ञानरचनावाद............
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोखा ता.बाळापुर जिल्हा अकोला शाळेतील मुलानी दिनांक ०३ जानेवारीला युको बॅन्क शाखा निम्बा येथे भेट दिली...
तेथे मॅनेजर कडुन मुलांनी खूप काही गोष्टी जाणून घेतल्या. ..
बॅन्केत जाण्याआधी तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांची थोडी पूर्वतयारी करूनच गेलो होतो......गेल्यावर शाखाधिकारी साहेब श्री जोंधळे  यांनी आमचे स्वागत केले. ..नंतर मुलांनी खालील मुद्द्यावर प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. ..
●बॅन्केचे नाव
●बॅन्केतील कर्मचारी व त्यांची कामे-
●बॅन्केतील कामकाज-●पैसे जमा व काढण्याची करण्याची पद्धत -●बॅन्केचे विवीध नियम-
●बॅन्केचे वेळापत्रक -●वस्तूंच्या किंमती-वगैरे वगैरे प्रश्न विचारून मुलांनी माहिती जाणून घेतली-प्रत्यक्ष काही वस्तूंचे वजनही,साखर, डाळ, शेंगदाणे,कडधान्ये इत्यादी यांचे) तर काही वस्तूंचा भाव राख्या ,चोकलेट ,बिस्कीट विध्यार्थ्यानी विचारपूस केली-खरंच. ........या आधी आमच्या शाळेतील मुलं या दुकानात कधी घरच्यांबरोबर तर कधी एकटी खरेदी च्या निमित्ताने आली असतील ही पण आज शाळेतील सर्व मुलांन बरोबरचा अनुभव त्यांचा खूप छान होता.. हे जाणवले..दुकानदार दिनकर काकांची अनौपचारिक मुलाखत ... चर्चा. .. काही प्रात्यक्षिक.... काही हिशोब... वगैरेंचा अनुभव या भेटीत मुलांना आणि पर्यायाने आम्हालाही खूप काही शिकवून गेला ...
.इ 3 री च्या परिसर अभ्यासातील घटकाच्या अनुषंगाने तसेच मुलांना गणिती क्रिया, हिशेब , दुकानातील व्यवहार वगैरे प्रत्यक्ष अनुभव आणि शिक्षण व व्यवहार यांची सांगड घालण्याचा हा शिक्षकांचा अल्पसा प्रयत्न....शेवटी शाखाधिकारी यांनी मुलांना चॉकलेट, बिस्किटे दिली मग काय ..मुले जाम खुश ..... खाऊ ....................दिल्याबद्दल मुलांनी त्यांचे आभार मानले.....
एक वेगळा छान प्रत्यक्ष अध्ययन अनुभव घेवून मुले आणि आम्ही शिक्षक आनंदात पुन्हा शाळेकडे आलो..................... .
0 comments

जिल्हा परिषद वरिष्‍ठ प्राथमिक शाळा. मोखा



शाळेचे नाव - जिल्हा परिषद वरिष्‍ठ प्राथमिक शाळा. मोखा ता. बाळापुर, जि. अकोला🌻
♻शाळेबद्दल थोडक्यात - मोखा हे छोटेसे गाव असून दुष्काळ गाव व अवर्षणग्रस्त भाग आहे. बाळापुर शहरापासून ३६ किलोमीटर वर वसलेले ९५० लोकसंख्येचे गाव आहे.
🏆आपल्या शाळा आपले वैभव, हे वैभव असेच वाढावे म्हणून मुलांना मराठी शाळेत शिकवा,
🏆मातृभाषेतून शिक्षणाशिवाय अन्य कोणत्याही भाषेतील शिक्षण बालकांवर ओझेच होय -
0 comments